भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेत मोठे अधिकारी व रेल्वे मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगून रेल्वे खात्यात टी.सी.ची नोकरी देण्याचे आमिष दाखवत रेल्वे नार्थ कॉलनीत राहणाऱ्या दोन भांवाना ३० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडा रा. शांतीनगर, भुसावळ याने आपले रेल्वेत मोठे अधिकारी व रेल्वे मंत्री यांची ओळख असल्याने महेंद्र संसारे व त्याचा भाऊ सचिन संसारे यांना रेल्वेव खात्यातील टी.सी. या पदावर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत २ मे २०१७ ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवळी ३० लाख रूपये घेतले. तरी देखील दोन्ही भावांना रेल्वेत नोकरी लावून दिली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेंद्र संसारे यांनी बुधवारी २० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडा रा. शांतीनगर, भुसावळ याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहे.