जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पूर्णवाद नागरी पतसंस्थाचे अध्यक्ष आणि कर्मचारी यांनी वसुलीचे अधिकार नसताना बेकायदेशीररित्या सही आणि पदनामची नोटीस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात जिल्हापेठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पूर्णवाद नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सत्यशील अविनाश अकोले आणि कर्मचारी रेखा रमेशचंद्र झांबरे दोन्ही रा. गणेश कॉलनी, जळगाव यांना वसुलीचा कोणतेही अधिकार नसताना त्यांनी समोरच्या व्यक्तीला नोटीसवर सही आणि पदनाम टाकून वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अनुषंगाने सहायक निबंधक कर्मचारी जगदीश बाबुराव बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष सत्यशील अविनाश अकोले आणि रेखा रमेशचंद्र झांबरे या दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.