तोतयागिरी करून जागेची परस्पर विक्री करून फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील गट नंबर १०७ मधील ४ हेक्टर जागा ही पाच जणांनी तोतयागिरी करून धरणगाव दुय्यम उपनिबंध कार्यालयात पावर ऑफ खरेदी करून खरेदी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अब्दुल हुसेन अली बोहरा वय-७२, रा. बुऱ्हानपूर, मध्य प्रदेश हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जिनिंग कंपनी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. धरणगाव तालुक्यातील विवरे शिवारातील गट नंबर १०७ मधील ४ हेक्टर ७४ आर ही जागा त्यांचे मयत झालेले वडीलांच्या नावावर आहे. दरम्यान त्यांच्या वडीलांचे हसेन अली सराफ अली बोहरी असे होते. याच नावाने असलेल्या नाशिक येथील एकाने तोतयागिरी करून पावर ऑफ ऍटाणीचा वापर करून २२ जून ते ६ जुलै २०२३ या कालावधीत हसेन अली सराफ अली बोहरी या तोतयाने धरणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात कागदपत्र सादर करून प्रमोद लक्ष्मण वाणी रा.पारोळा, योगेश भुरा धनगर रा. नंदुरबार, नरेंद्र रतीलाल धनगर रा, विरदेल ता. शिंदखेडा आणि हुसेन हाशिमभाई मर्चंट रा. नंदुरबार यांना सोबत घेवून ही जागा खरेदी विक्री केल्याचे दाखविले. त्यानंतर ही जागा प्रमोद लक्ष्मण वाणी रा. पारोळा आणि योगेश बुरा धनगर रा. नंदुरबार या दोघांची नावे तलाठीकडे जावून लावून घेतले. हा प्रकार अब्दुल हुसेन अली बोहरा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मोद लक्ष्मण वाणी रा.पारोळा, योगेश भुरा धनगर रा. नंदुरबार, नरेंद्र रतीलाल धनगर रा, विरदेल ता. शिंदखेडा आणि हुसेन हाशिमभाई मर्चंट रा. नंदुरबार आणि तोतया तोतया हासन अली सराफ अली बोहरी रा. सातपूर, नाशिक याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बागुल हे करीत आहे

Protected Content