यावल( प्रतिनिधी) येथील शहरातील हुसेनी गल्ली बाबुजीपुरा परिसरातील शेख फुरकान या चार वर्षीय बालकाने रमजानचे पावित्र रोजा धरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हुसेनी गल्ली बाबुजीपुरा परिसरातील राहणारे शेख ईरफान अ. लतीफ उर्फ ईम्मु यांच्या चार वर्षीय शेख फुरकान या मुलाने रमजानचे पावित्र रोजा ( उपवास ) ठेवला होता. त्यांने दाखवलेल्या धाडसाचे कुंटुबातील व समाजातील नागरीकांनी कौतुक करुन त्यास आशीर्वाद दिला. शेख फुरकान हे सामाजीक कार्यकर्त अब्दुल समद यांचे नातू व काबीज शेख यांचे भाचे आहेत.