यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव गावजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोरून कार क्रमांक (एमएच ०३ बीजे ८२५३) मधून ज्योती भादले, मिनाक्षी सुलताने, आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीला ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतिका परवीन तडवी चोपडयाकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय जात असतांना मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघाता कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतू कारमधील चार महिला गंभीर जखमी झाल्या आहे. नागरिकांच्या मदती तात्काळ किनगाव येथील प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात येथील पाठविण्यात आले आहे.