Home क्राईम चौपदरीकरणाचे काम : पाण्याचे टॅकर पलटी; चालक जागीच ठार

चौपदरीकरणाचे काम : पाण्याचे टॅकर पलटी; चालक जागीच ठार

a2041ef5 db41 4d19 96e0 fdc081f376f7
a2041ef5 db41 4d19 96e0 fdc081f376f7

a2041ef5 db41 4d19 96e0 fdc081f376f7
 

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव – गोलाईत गावाजवळ चौपदरी करणाचे काम सुरु आहे. याठिकाणी आज दुपारी पाण्याचे टॅकर पलटी होत, चालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

 

 

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव – गोलाईत गावाजवळ चौपदरी करणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी मोयगाव येथील ज्ञानेश्वर बळीराम पाटील (वय ३३) हा तरुण पाण्याच्या टॅकरवर वाहन चालक म्हणून काम करीत होता. आज सकाळी साधारण साडे अकरा वाजेच्या सुमारास पाण्याचे टॅकर वळवीत असतांना अचानक रस्त्याचे काम सुरु असलेल्या खड्ड्यात घसरून पडले. त्यात ज्ञानेश्वर हा टॅकरखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, शवविच्छेदनासाठी ज्ञानेश्वरचा मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound