Home Cities जळगाव दोन दिवस रद्द झाल्यात ‘या’ रेल्वे गाड्या ! : जाणून घ्या माहिती

दोन दिवस रद्द झाल्यात ‘या’ रेल्वे गाड्या ! : जाणून घ्या माहिती

0
40

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबई आणि पुण्याकडे जाणार्‍या काही प्रवासी रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

पाचोरा रेल्वे स्थानकावर कामे करण्यात येणार असल्यामुळे मुंबई व पुण्याकडे जाणार्‍या चार प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण केले आहे, त्यांना स्थानकावरील तिकिट खिडकी किंवा ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात तिकिटांचा परतावा मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या प्रवासी रेल्वा गाड्यांमध्ये इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. तसेच काम होत असतांना अप आणि डाऊन म्हणजे दोन्ही मार्गावरील १२ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. यामुळे या गाड्या अनेक तास विलंबाने धावणार आहेत.


Protected Content

Play sound