काश्मीरमध्ये २४ तासांत ४ दहशतवादी ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात ४ चकमकी झाल्या आहेत. आता पुन्हा शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक सुरू झाली असून त्या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती आहे. बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन दहशतवादी मारले गेले असून यात लष्करचा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यात जवानाला यश मिळाले आहे.

 

बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर शोपिया जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या चार चकमकींमध्ये आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले. बारामुल्लातील कलंतरा भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. अद्याप चकमक सुरू असून यात एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. बारामुलात दहशतवाद्यांनी होळीच्या दिवशी शोधमोहीम सुरू असताना जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर काही मिनिटांच्या आत सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. परंतु, या ठिकाणी एकही भारतीय जवान जखमी झाला नाही, अशी माहिती देखील लष्कराकडून देण्यात आली.

Add Comment

Protected Content