धरणगाव तहसील कार्यालयातून चार वाळूचे ट्रॅक्टर पळविले

27jnph51 20180152099

धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा करण्यात आले होते. परंतु अज्ञात चोरट्यांनी दि. २१ सायंकाळी ६.३० ते २२ फेब्रुवारी सकाळी ८.०० वाजेदरम्यान सदरचे ट्रॅक्टर पळवून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रभारी नायब तहसीलदार गणेश माळी यांनी धरणगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

 

तालुक्यातून अवैध गौणखनिज वाहतूक करताना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ४ ट्रॅक्टर हे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी जप्त केले होते. तसा पंचनामा करण्यात आला होता. विना नंबर असलेले ट्रॅक्टर व ट्राॅली क्रमांक एम.एच.१९ बी.एन.९६१३ हे सोपान प्रल्हाद पाटील (रा.चांदसर) एम.एच.२८ डी.३५७७ हे गणपत पुंडलिक नन्नवरे (रा.बांभोरी) एम.एच.१९ ए.एन. ०७४६ राकेश किसान पाटील, (रा.खरदे) एम.एच.१९ ए.एन.२८४८ पंढरीनाथ वना शिरसाळे (रा. बांभोरी) डंपर क्र. एम.एच.३१ सी.बी. ३५१७ हे मनोज चंदू नन्नवरे (रा.बांभोरी) यांचे आहे. या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार वाहन मालक यांना दंडात्मक नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु दंडाची रक्कम भरण्यात आली नसतांना अज्ञात व्यक्तींनी सदरची वाहने तहसील कार्यालयातून पळवून नेली. या वाहनांमध्ये साधारण तीन लाख रुपये किमतीची वाळू होती. अशी फिर्याद देण्यात आलेली असून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद नेवे हे करीत आहेत.

Add Comment

Protected Content