नायलॉन मांजी विक्री करणाऱ्या चार जणांवर करवाई; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरात विनापरवाना नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी रामानंद नगर पोलीसांनी गुरूवारी १३ जानेवारी रोजी दुपारी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात  चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये मकरसंक्रातच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. असे असतांना शहरातील पिंप्राळा भागात काही भागात दुकानदार विना परवाना असलेला नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना गुरूवार १३ जानेवारी रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरीष डोईफोडे आणि उमेश पवार यांनी पिंप्राळा परिसरात दोन ठिकाणी कारवाई केली. दोन्ही दुकानांवर प्रत्येकी ३ हजार ३५० आणि १ हजार १०० असा एकुण ४ हजार ४५० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोहेकॉ हरिष डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल बळीराम वाणी रा. रामानंद नगर, अब्दुल हक अब्दुल अजिज रा. पिंप्राळा, विजय माखनलाल सोनी रा. नालीनी नगर, पिंप्राळा आणि निलेश सुरेश सुर्यवंशी रा. रामानंदनगर अश्या चार जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण आणि जितेंद्र तावडे करीत आहे.

 

 

Protected Content