अडावद येथील खुनाच्या गुन्ह्यात चार जणांना अटक !

अडावद ता.चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील हजरत पिरपाकरशहा बाबाच्या दर्ग्याजवळ १ रोजी झालेल्या ४५ वर्षीय इसमाच्या खुनाच्या तपासात पाच दिवस कसून तपास केल्यानंतर चौघा अरोपितांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्या चौघां आरोपींना चोपडा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार १ रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती दिली की, अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दरग्या समोर एक इसम मयत स्थितित पडलेला आहे. यावरून अडावद पोलीसांनी तेथे जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी अंदाजे ४५ वर्ष वयाचा इसम मयत स्थितित पडलेला होता. तेव्हा पोलीसांनी आजु बाजुच्या लोकांना विचापुस केली असता सदर मयत इसम हा जगदिश फिरंग्या सोलंकी ( वय ४५ रा. पाटचारी अडावद ता. चोपडा) असे असल्याची माहिती मिळाली पंचांसमक्ष पोलीसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला असता मयताच्या अंगावर ठिक ठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण दिसत होते. तसेच मयताच्या डोक्यावर, कपाळावर तसेच कानावर गंभीर जखमा दिसत होत्या तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचे व्रण दिसत होते. तरी सदर बाबत मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी वय २० रा.पाटचारी अडावद ता. चोपडा याचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी याचे विरुध्द अडावद पो.स्टे. गुन्हा रजि.नं.१५७/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content