साडेचार लाखाची रोकड जप्त; निवडणूक निरीक्षक पथकाची कारवाई

116735 money

जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदार संघात असलेल्या बोदवड- मलकारपूर रोडवरील जांभूळधाबा या गावाजवळ सोमवारी रात्री एका कारमधून सुमारे 4 लाख 70 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत कार आणि संबंधित कार चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत मलकापूर ग्रामीण पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, रावेर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत मलकापूर शहराजवळ बोदवड-मलकापूररोडवर जांभूळधाबा येथील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वारासमोर रात्री 9 वाजेच्या सुमारास गाडी क्रमांक (एमएच 28 व्ही 9256) या गाडीतून लोकसभा निवडणुक निरीक्षक भरारी पथकाने गाडीची तपासणी केली असता त्यातून चार लाख 70 हजार रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले. याबाबत चालक दीपक काशिनाथ धूमाके रा. मोताळा याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. समाधानकारक उत्तरे न दिल्याने मलकापूर ग्रामीण पोलीसांनी चालक दिपक धुमाके याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान कारवाई केल्यानंतर 4 लाख 70 हजार रूपये रकमेचा निरीक्षक भारारी पथक प्रमुख वि.के.पाटील व तलाठी एस.व्ही. कुराडे यांच्या समक्ष पंचनामा करून रक्कम जप्त करण्यात आली आहे. आता ही रक्कम कोठून कोणाच्या माध्यमातून कोठे जात होती, याची सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईची मलकापूर ग्रामीण पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास एएसआय व्ही.एस.ठाकूर हे करीत आहे.

Add Comment

Protected Content