जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतांनाच सरार्सत गुन्हेगार असणार्या चौघांना जिल्हा प्रशासनाने हद्दपार केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांना चाप लावण्याचे काम सुरू केले आहे. खरं तर या आधीच जिल्ह्यात हद्दपारीच्या कार्यवाही सुरू झाल्या होत्या. एम. राजकुमार पोलीस अधिक्षक असतांना या कारवायांना वेग आला होता. यात आता चार नव्या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एम. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने हद्दपार केलेले चौघे गुन्हेगार हे जामनेर तालुक्यातील आहेत. यात इरफान लालखा तडवी ( वय २७, रा. पहूर, ता. जामनेर ); शाहरूख बनेखा तडवी ( वय ३३, रा. पहूर); प्रदीप रायदास पाटील (वय २४, रा. पहूर) आणि शेख राज शेख समद (वय २४, रा. पहूर) या चौघांचा समावेश आहे. या चौघांची चोरी असून त्यांच्या विरोधात चोरी, लुटमारी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.