जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत चौघांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून चौघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, विनोद धनसिंग पवार (वय-25), खडके एरंडोल, विजय नेतू नेहते (वय-32), कोथडी ता. मुक्ताईनगर, मंगा नारायण मोरे (वय-65), नांद्रा ता.जळगाव, सोनू विठ्ठल मोरे (वय-23), जगवानी नगर, जळगाव यांना वेगवेगळ्या घटनेत विषबाधा झाला असून चौघांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.