गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह चारजण अटकेत; चोपडा पोलिसांची कारवाई

चोपडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोपडा ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील चार आरोपींना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत एक बनावट गावठी कट्टा (पिस्टल), दोन जिवंत काडतुसे आणि चार मोबाईल जप्त केले असून एकूण मुद्देमालाची किंमत ४९ हजार आहे.

गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह चारजण अटकेत;
चोपडा पोलिसांची कारवाई

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त माहिती मिळाली की, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता हातेड (ता. चोपडा) शिवारातील बुधगाव जाणाऱ्या फाटा रोडवर काही इसम गावठी कट्टा घेऊन जात आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी बुधगाव फाट्यावर सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद चार इसम त्या ठिकाणी थांबलेले आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख उघड केली.

यांना केली अटक :
वैभव शैलेश गायकवाड (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, ता. हवेली, पुणे), सुजल प्रकाश गायकवाड (वय २१, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, ता. हवेली, पुणे), सौरभ सुनिल जाधव (वय २१, रा. सर्वोदय कॉलनी, वडगाव शेरी, ता. हवेली, पुणे) आणि स्वयं पिंटू रॉय (वय २१, रा. सर्वोदय कॉलनी, भोईराज सोसायटी, मुंढवा, ता. हवेली, पुणे अशी नावे आहेत.

त्यांच्या अंगझडतीत बेकायदेशीर आणि विनापरवाना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच चार मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस नाईक विठ्ठल पाटील यांनी फिर्याद दिली असून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि पोलिस नाईक विनोद पवार करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोकॉ रावसाहेब पाटील, चेतन महाजन, विठ्ठल पाटील, विशाल पाटील आणि प्रमोद पारधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Protected Content