भुसावळातील गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथे आज पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणी बांधकाम सभापती रवींद्र खरात यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील समता नगर परिसरात दोन गटांमध्ये आज पहाटे जोरदार धुमश्‍चक्री झाली. यात गोळीबारसुध्दा झाल्याने परिसरातील लोक जागी झाले. यात काही वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. तर घरावर दगडफेकदेखील करण्यात आली. या संघर्षाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या प्रकरणी भुसावळ नगरपालिकेचे बांधकाम सभापती रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह बाळा मोरे, राहूल उर्फ बाळा सोनवणे आणि शुभम तायडे या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर आज सकाळी अपर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांनी घटनास्थळाला भेट देऊन आढावा घेतला. त्यांच्यासोबत पोलीस निरिक्षक देवीदास पवार हेदेखील होते. मतानी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र गोळीबाराबाबत विचारणा केली असता तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

पहा– भुसावळातील गोळीबाराबाबतचा वृत्तांत.

Add Comment

Protected Content