चाळीसगावातून विवाहितेसह दोन मुले दीड महिन्यापासून बेपत्ता

missing

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील रामवाडी येथील विवाहिता दोन मुलांसह गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी येथील शहर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. यांच्याबाबत माहिती मिळाल्यास चाळीसगाव पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील रामवाडी येथे सचिन आनंदा घोटकर हे पत्नी संगीता सचिन घोटकर (वय-२६), मुलगी वैष्णवी (वय-०६) आणि मुलगा श्रावण (अडीच महिने) यांच्यासह राहतात. ७ सप्टेंबर रोजी नातेवाईकांसह जेवण करून रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण झोपले. मध्यरात्री सचिन घोटकर यांच्या आईला जाग आली असता पत्नी संगीता, वैष्णवी आणि मुलगा श्रावण घरात नसल्याचे आढळून आले. रात्री सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र ते मिळून न आल्याने येथील शहर पोलीसात तिघेजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी घरातून अचानक बेपत्ता झालेले हे तिघेजण अद्यापही मिळून आले नसल्याने याबाबत कुणाला संबंधित फोटोवरून ओळखीचे वाटल्यास त्यांनी येथील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content