पुणे प्रतिनिधी । माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि प्रख्यात पत्रकार अरुण शौरी यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
७८ वर्षीय शौरी यांना रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते लवासा सिटीमधील घराच्या अंगणात फेरफटका मारत असतांना भोवळ येऊन पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाली आहे. काल रात्री दहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. डोक्याला खोक पडल्यानं ते सध्या आयसीयूत आहेत. सध्या त्यांची स्वभाव प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.