अपघातातून सुदैवाने बचावले माजी सभापती नारायण चौधरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सांगवी ते भालोद दरम्यानच्या मार्गावर सांगवी गावाजवळ एसटी बस व चारचाकी मोटर कारला बसचा कट लागल्याने झालेल्या अपघातात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी हे जख्मी झाले असुन त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील सांगवी बु॥ते भालोद गावा दरम्यान दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भुसावळकडून सांगवी कडे येणारी एस टी बस क्रमांक एमएच १४ बिटी २६९८या भुसावळकडून डोंगर कठोरा जाणाऱ्या बसचा आणी भालोद तालुका यावल येथील राहणारे व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी हे सांगवी कड्रन भालोद येथे आपल्या गावाकडे त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने जात असतांना अचानक त्यांच्याकडील चारचाकी वाहनास एसटी बसचा कट लागल्याने त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. प्रथम त्यांना भालोदच्या प्राथमिक केन्द्र व नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच फैजपुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .

Protected Content