नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी दिल्लीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.त्रिपाठी हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अंत्ययात्रेला राष्ट्रवादीसह अनेक पक्षातील नेते हजेरी लावणार असल्याचे कळते.