मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत होते. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती.
दरम्यानच्या काळात ते राज ठाकरे यांच्या मनसेत सक्रिय होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उपरकर यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.