अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याचे माजी आमदार साहेबराव पाटील आपल्या विकास कामांमुळे नेहमीच चर्चेत राहात असतात. प्रश्न कोणताही असो, तो सोडल्याशिवाय ते शांत बसत नाहीत.
सध्या उष्णतेची तीव्रता वाढली असून पाण्यासाठी पशुधन इकडे-तिकडे फिरतांना दिसत आहे. माजी आमदारांनी सामाजिक बांधीलकी जोपासत भगवा चौकात बोअरवेलला लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने विद्युत मोटार लावल्यामुळे
सध्या रस्त्यावरच्या गुरांची तहान भागतांना दिसत आहे. भगवा चौकातील स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.