यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच सूर्यभान हिरामण पाटील यांच्या पत्नी तसेच साकळी-दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र सूर्यभान पाटील, विजय पाटील, नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री कै.सौ.सोनाबाई सूर्यभान पाटील यांचे नुकतेच (दि.१३) अल्पश: आजाराने निधन झाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज (दि.१८) पाटील परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी खा. रक्षा खडसे, ना. हरिभाऊ जावळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर हे ही उपस्थित होते. दरम्यान माजी आ. शिरीष चौधरी, शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती डॉ. दिलीप पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पंचाय समिती समिती सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, काँग्रेस जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, अमित देशमुख यांच्यासह इतर गटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन्य पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही पाटील परिवाराचे सांत्वन केले आहे.