जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जळगाव तालुक्यातील भादली, कडगाव, शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीला ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गुलाबराव देवकर यांनी ग्रामीण जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. तर जेष्ठांनी भरभरून आशिर्वाद देत विजयाचा आशिर्वाद दिला.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांमध्ये प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. त्यांनी महिलांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हित आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील पंचसूत्री योजनेची माहिती दिली.
या प्रचार रॅलीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकुळ चव्हाण, डॉ. अरुण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय नारखेडे, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, शेळगावचे माजी सरपंच हरीष कोळी, रामा कोळी, निवृत्ती कोळी, कानसवाडे येथील सरपंच संजय कोळी, माजी उपसरपंच सुकदेव कोळी, भोलाणेचे सरपंच नितीन सपकाळे, कडगावचे मुरलीधर कोळी आणि पंढरीनाथ कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.