Home Cities जळगाव  माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी बजावला मतदानाचा हक्क 

 माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी बजावला मतदानाचा हक्क 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लोकशाहीच्या उत्सवात मान्यवरांचा सक्रिय सहभाग दिसून आला. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, नागरिक उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत.

प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवणारे शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान करत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

मतदानानंतर लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी संवाद साधताना विष्णू भंगाळे यांनी जळगावकर नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले की, “कटुता, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि विरोधाच्या राजकारणापलीकडे जाऊन जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून मतदारांनी योग्य आणि सक्षम उमेदवाराची निवड करावी.”

जळगाव शहराचा विकास, पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक राजकारणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांचा मतदान प्रक्रियेत वाढता सहभाग शहराच्या भविष्यासाठी आशादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound