माजी गृहमंत्री देशमुखांना दिलासा नाही! जे.जे.तच शस्त्रक्रिया करा

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खाजगी रुग्णालयाऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करा असे निर्देश दिले असून विशेष न्यायालयाकडून दिलासा देण्यास नकार दिला आहे.

महाविकास आघाडीतील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे वसुली प्रकरणी इडीच्या कारवाईमुळे अटकेत आहेत. माजी मंत्री देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार देशमुख यांनी खाजगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यास वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या खाजगी रुग्णालयातील उपचारावर सोमवारी विरोध केला होता. देशमुख यांच्यावर जे.जे. रुग्णालयात खाजगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार मिळतील असे प्रतिज्ञापत्रात इडीकडून नमूद करण्यात आले होते.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या त्यानुसार त्यांच्या निवडीच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे हा मंत्र्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद देशमुख याच्या वकिलांनी केला होता. यावर निकाल राखून ठेवण्यात येऊन त्यावर आज विशेष न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांना दिलासा देण्यात न्यायालयाने नकार दिला असून जे.जे. रुग्णालयातच खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

Protected Content