सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी नारायणे राणे यांच्या भाजप प्रवेश मुहूर्त ठरला असून 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे.
नारायण राणे येत्या 2 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता गरवारे क्लब येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेशही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पारंपरिक शत्रू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा यासाठी एवढे दिवस नारायण राणेंचा भाजप प्रवेश लांबला होता.