पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात माजी चेअरमनला अटक

pmc

 

मुंबई वृत्तसंस्था । पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी बँक) ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग यांना अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर पोलीस गेल्या काही दिवसांपासून वरयाम सिंग यांचा शोध घेत होते. अखेर आज ते पोलिसांच्या हाती लागले असून माहीम चर्च येथून त्यांना अटक करण्यात आली आहे व ४२०, ४०९, ४६५, ४६४, ४०६, ४७१, १२० ब या कलमांन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी विशेष तपास पथक करत आहे, अशी माहिती उपायुक्त प्रणय अशोक यांनी माध्यमांना दिली. याआधी शुक्रवारी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली असून त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे.

Protected Content