सेन्टेन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी कार्यक्रम

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक सेन्टेन्स स्कूल मध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात जीएस कॉलेजचे उपप्राचार्य श्री डॉक्टर प्रफुल उबाळे सर यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रत्ना मेरी व डॉक्टर उबाळे सर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सिस्टर रत्ना मेरी यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

त्यानंतर स्वागत गीत व इतर कार्यक्रम सादर करण्यात आले. डॉक्टर उबाळे सर यांनी निवडून आलेल्या विद्यार्थि तन्मय करे व उपप्रतिनिधी प्रथमेश पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी विविध ग्रुपच्या प्रतिनिधि जसे प्रज्वल पवार (लाल ग्रुप) प्रणव इंगळे (हिरवा ग्रुप) अनुष्कायडे (निळा ग्रुप) कुमारी अनन्या मिश्रा (पिवळा ग्रुप) या प्रतिनिधींचे तसेच खेळाचे प्रतिनिधी स्वरित गायकवाड व स्वरित तीडोळे यांचे देखील अभिनंदन केले. या कार्यक्रमात सिस्टर रत्नागिरी यांनी निवड झालेल्या सर्व प्रतिनिधींना शपथ दिली या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने सांगता झाली.

 

Protected Content