‘कोरोना कालावधीतील प्राथमिक शाळांची फी माफ करा’; राष्ट्रवादीची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, संदीप होले । कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांना मोठ्या प्रमाणावर भुर्दंड बसला आहे. त्यामुळे चौथीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शाळांची फी शासनाने माफ करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शहरच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, कोरोना झाल्यापासून सुरुवातीचे काही महिने कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी राज्यातील आणि जिल्ह्यातील संपूर्ण शाळा बंद करण्यात येऊन त्याद्वारे शिक्षण घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटद्वारे शिक्षण घेण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, पालकांनी आपल्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली, परंतु नर्सरी, जूनियर केजी, सिनियर केजी तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षण हवे तसे मिळालेले नसून शाळेची फी आणि मोबाइलचा खर्चाचं वाढतं प्रमाण यासह कोरोनामुळे रोजगार बंद असतांना जनतेवर अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. तरी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शाळेचे फी बंद करण्यात यावी” अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

फेसबुक व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/748037539492858

Protected Content