चाळीसगावात विवाहीतेचा विनयभंग ; एकाविरुद्ध विनयभंग व ॲट्रासिटीचा गुन्हा

vinay bhang

 

चाळीसगाव (प्रतिनीधी) शहरातील एका विवाहीतेचा पाठलाग करुन तिला अश्लील हातवारे करत पैसे दाखवून रात्री-बेरात्री तिच्या घरी जाऊन त्रास देणाऱ्या एका विकृताविरुद्ध विनयभंग व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

येथील एका २७ वर्षीय विवाहीतेचा पती कामानिमीत्त बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे ती आपल्या २ मुलांसोबत घरी एकटीच राहते. विवाहीता किराणा दुकानावर साहीत्य खरेदीसाठी, मुलांना शाळेत सोडण्यास व घेण्यास जात असतांना पंचशिल नगरमधील टेलर महंमद रज्जाक सैय्यद (५२) हा काहीतरी बहाण्याने महीलेच्या मागे जाऊन पाठीमागुन बारीक खडे मारुन व अश्लिल हावभाव ईशारे करुन हातात पैसे दाखवुन नेहमी त्रास देत होता. पती घरी नसल्याने बदनामी व भितीपोटी हा त्रास पिडीतेने अनेक दिवस सहन करीत होती. दोन ते तीन दिवसापुर्वी आरोपी टेलर महंमदने रात्रीच्या सुमारास खिडकीतून हात टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू पिडीत विवाहितेने आरडा-ओरडा केल्याने त्याने पलायन केल्याचे महीलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी महंमद टेलर हा खुनशी व आडदांड, खुनशी असून त्याच्यापासून विवाहीतेच्या कुटुंबीयास धोका निर्माण झाला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

 

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, २ ऑगस्ट रोजी विवाहीता सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुलास शाळेत सोडवण्यास गेली होती. तिकडुन घरी परतत असतांना वाटेवरच रेल्वे पुलाजवळ किराणा दुकानात चहा पावडर घेण्यास थांबली. त्यावेळी आरोपी महंमद टेलर याने अश्लिल हावभाव करुन दोन हजार व पाचशेच्या नोटा दाखवून दुकानातून ब्लेडपान घेऊन तिला धमकावण्याचा प्रकार देखील त्याने केला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पिडीत विवाहितेने सदर प्रकार घरी जाऊन पाहुणचारासाठी आलेले भाऊ,भावजयीस व थोड्या अंतरावर राहत असलेल्या सासु व दिराला हा प्रकार सांगीतला. त्यांतर त्यांनी पिडीत विवाहितेला मानसीक आधार दिल्यावर आरोपी महंमद (टेलर) रज्जाक सैय्यद याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध ॲट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महंमद टेलरला अटक करण्यात आली असून तपास डीवायएसपी उत्तम कडलग करीत आहेत.

Protected Content