जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रिरेश उर्फ श्याम दिनेश पाटील (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिरेश पाटील हा आपल्या आई-वडील आणि दोन भावांसोबत सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला होता. खासगी कंपनीत तो नोकरीला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांला पाठीचा त्रास होता. गेल्या आठवड्यात त्याच्या औषधोपचार करून शास्त्रक्रीया करण्यात आली होती. हा त्रास त्याला सहन होत नव्हता. सोमवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी वडील हे बैठकीसाठी बाहेर गेले तर आई मंदीरात गेली होती. त्यामुळे प्रिरेश हा घरात एकटाच होता. त्यावेळी त्यांने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी ६.३० वाजता प्रिरेशची आई वंदना पाटील ह्या घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आला. नागरीकांच्या सहकार्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे. त्याच्या पश्चात आई वंदना, वडील दिनेश मधुकर, जुडवा भाऊ श्रीरेश आणि मोठा भाऊ भागवत असा परिवार आहे.