जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व कुमुद प्रकाशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर्स डे’च्या औचित्याने जळगाव शहरातील नामवंत डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
दि. १ व २ जुलै २०२२ रोजी शाल, श्रीफळ आणि ग्रंथदान देऊन मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अभियानाचा प्रारंभी डॉ. सुशील गुजर यांचा सत्कार सिंधु सुतार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वरील चरित्र ग्रंथ देऊन करण्यात आला. डॉ. गुजर यांनी अत्यंत विनम्रपणे सिंधू सुतार यांचाही कृतज्ञतेने शाल देऊन सत्कार करीत शुभाशिर्वाद घेतले.
तत्पूर्वी डॉ.सुशील गुजर यांनी त्यांच्या मातोश्री स्व.अवन्तिका गुजर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली. त्यावेळी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे व डॉ. समिक्षा पाटील उपस्थित होते.
कोविड महामारी काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्यदक्षतेने आणि समर्पण भावनेने डॉक्टरांनी केलेल्या रुग्णसेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्दिष्टाने डॉक्टर्स डे निमित्त सत्काराचे आयोजन आणि सद्वर्तन तथा प्रेमळ शब्दाने मानसोपचारासह विविध शिबिरांच्या आयोजनातून केलेली जनसामान्यांची निःशुल्क तपासणी व उपचार या कार्याची दखल घेऊन केलेला पुस्तक भिशी अंतर्गत गौरव डॉक्टर्स मंडळींना भावला. विशुद्ध भावनेने केलेले अनौपचारीक सत्कार समाजसेवेसाठी अक्षय ऊर्जा देतात या भावना सत्कारार्थी डॉक्टरांनी विनम्रपणे व्यक्त केल्या.
स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ डॉ. पूनम दुसाने यांचा सत्कार निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी अप्पासाहेब निळकंठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी नानासाहेब सुरेश दुसाने, विजय लुल्हे, पत्रकार सुनिल महाजन नशिराबादकर उपस्थित होते. मानसोपचार तज्ज डॉ.कांचन नारखेडे व बालरोगतज्ज्ञ डॉ.अमित नारखेडे दाम्पत्याचा सत्कार निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते आणि डॉ.रजनी नारखेडे व डॉ. शांताराम नारखेडे ( निवृत्त वैद्यकिय अधिकारी ) दाम्पत्याचा सत्कार कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेश वाल्डे यांचा सत्कार दिवाकर खंडू चौधरी माध्यमिक विद्यालय, डांभुर्णीचे मुख्याध्यापक उमाकांत महाजन यांच्या हस्ते आर्टिस्ट दतात्रेय शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
डॉ.संजय महाजन यांचा सत्कार पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी कैलास मोरे कानळदेकर व गुलाब तडवी मान्यवर उपस्थित होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संदिप भारूडे यांचा सत्कार संपादक शैलेंद्र ठाकूर यांच्या हस्ते आणि डॉ. स्वाती गरेकर यांचा सत्कार भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते डॉ.धनंजय मालणकर, निकिता अग्रवाल व मार्केटिंग ऑफिसर के.वाय.बडगुजर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ब्रेन स्पेशॅलिस्ट डॉ. केतन बोरोले यांचा सत्कार पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.विजय महाजन यांचा सत्कार पुरणपोळी फेम लता पाटील व वर्षा शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी सुभाष जाखेटे, राहुल मांडोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाहीसाठी प्रेरणा निवृत्त शिक्षण उपसंचालक, साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल, अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, पत्रकार दीपक महाले यांनी दिली.