अमळनेर (प्रतिनिधी) पवित्र रमजान ईद सणानिमित्त धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन 1 जून आधी व्हावे,यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण अहिरे यांना शिक्षक भारती संघटनेच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी प्रविण अहिरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी तत्काळ वेतन पथक अधिक्षक,धुळे यांना मे पेड जून वेतन 1 जून पुर्वी अदा करण्याचें लेखी आदेश दिले. सोमवार,दिनांक 13 मे 2019 पर्यंत मे पेड जून महिन्याचे वेतन देयके त्वरित वेतन पथक कार्यालयात जमा करावेत,असे आवाहन धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात येत आहे. यावेळी शिक्षक भारती संघटना, धुळे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे,जिल्हा सचिव सी.टी.पाटील,जिल्हा उपाध्यक्ष-शैलेश धात्रक,महानगर उपाध्यक्ष-कानिफनाथ सुर्यवंशी,महानगर सचिव-हर्षल पवार,महानगर सहसचिव- सचिन मोरे,संदीप पाटील उपस्थित होते.