मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी वारीसाठी राज्य सरकारने दोन समन्वयकांची नियुक्ती केली असून यात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असणार्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लवकरच पंढरपुरात लक्षावधी भाविक दाखल होणार आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात येणार असल्याने त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय न होण्यासाठी सरकारने दाने समन्वयक नेमले आहेत. यात राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन आणि राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांचा समावेश आहे.
या दोन्ही समन्वयकांवर वारीच्या कालावधीत वारकर्यांसाठी संपूर्ण सुविधांची व्यवस्था करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडण्याची महत्वाची जबाबदारी हे दोन्ही समन्वयक पार पाडणार आहेत.