भुसावळ, प्रतिनिधी | येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते उमाकांत शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि.१४) शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.त्यात प्रामुख्याने श्री संत गाडगेबाबा वसतिगृहातील ग़रीब मुलांना अन्नदान (जेवण) देण्यात आले.तसेच लक्ष्मी चौकात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख जगदीश कापडे, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जाधव यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक शकीलभाई, माजी नगरसेवक अजय पाटील, युवासैनिक मिलिंद कापडे, युवासेना शहर अधिकारी सूरज पाटील, गोसेवक रोहित महाले, जितु पवार, डॉ. भरत महाजन, पवन बाक्से, मुर्गेंन कुलकर्णी, सर्प मित्र किरण भाई, अबुजर शेख,शिव मंडल चे पूजन महाजन, पिंटू नागरे, अजय चौरसिया, शिवम चौरसिया, अंसार शाह, सचिन श्रीनाथ, कैलाश भोई, राहुल राजपूत, आदित्य शर्मा, माजी शाखा प्रमुख मनीष चौरसिया, संजय अग्रवाल, शाखा प्रमुख धीरज वरडोनकर, नितेश मिश्रा, दीपेश शर्मा, मनोहर गोठवाल, ऋषभ अग्रवाल, ‘अलंकार मंडल’चे अमोल सोनार, धनराज सोनार, सागर शिंदे, भूषण किरंगे, उपस्थित होते. यावेळी जगदीश कापडे यांच्या हस्ते शाखा प्रमुख मनोज अग्रवाल, उपशाखा प्रमुख भूषण जोशी, शाखा सचिव गौरव शर्मा यांना शिवबंधन व शिवसेनेच्या भगवा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.