यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाचा आदिवासी दिन हा नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
या संदर्भात विनीता सोनवणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात दरवर्षी ९ आगष्ष्ट रोजी मोठया प्रमाणात साजरे करण्यात येणारे आदिवासी दिनाचे कार्यक्रम मात्र या वर्षी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर अत्यंत साद्या पध्दतीने साजरा होणार आहेत. आदिवासी बंधुनी आप-आपल्या गावी सुरक्षिततेचे नियमाचे व शिस्ती पालन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करावा. कोवीड १९ चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्याने आणि संसर्गात वाढ होवू नये म्हणून शासन आदेशानुसार एकत्रीत जमण्यावर व सामुहीक कार्यक्रमावर मर्यादा आहेत. त्यामुळे ९ आगष्ट रोजी दरवर्षी साजरा होत असलेला आदिवासी दिन प्रकल्प कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थीतीत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. तर आदिवासी बंधु, संघटना, संस्था, शाळा, वस्तीगृहे, आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी साजरा करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी केले असून आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधुना शुभेच्छा दिल्या आहेत.