पुलवामातील त्रालमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

58762 lqfzscmfto 1498098656

श्रीनगर (वृत्तसेवा) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मागच्या तासाभरापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तिथे स्फोट झाला आहे.

त्राल परिसरात काल संध्याकाळपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. एका इमारतीत दहशतवादी लपून बसले आहेत. जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठीच सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहितीही त्यांनी दिली. याआधी कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये तीन दिवस चकमक सुरू होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी रविवारी दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. याच चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले होते.

Add Comment

Protected Content