Home Cities जळगाव जळगावात भाजप स्थापना दिन निमित्त ध्वजारोहण

जळगावात भाजप स्थापना दिन निमित्त ध्वजारोहण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने भाजप कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे ध्वजारोहण व श्रीराम नवमी निमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. गजानन काका जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण व श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी, तसेच महेश जोशी, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, भगत बालानी, राजेंद्र घुगे पाटील, कैलास आप्पा सोनवणे, रेखाताई वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पदाधिकारी अजित राणे, राहुल वाघ, प्रकाश बालानी, राजूभाऊ मराठे, सुचिताताई हाडा, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, तसेच युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, महिला मोर्चा पदाधिकारी सुरेखाताई तायडे, नंदिनीताई दर्जी, नगरसेविका गायत्री ताई राणे, दीपमालाताई काळे, व अतुल भाऊ बारी यांची उपस्थिती होती.

तसेच मंडळ अध्यक्ष संजय शिंदे, राहुल घोरपडे, सुनील सरोदे, मनोज काळे, विनोद महाजन, महेश कापुरे आणि जिल्हा व मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाडी व प्रकोष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात देशभक्तीपर जयघोष, एकात्मतेचा संदेश आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे उद्बोधन झाले. उपस्थितांनी भाजपच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली आणि भविष्यात पक्षाचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound