रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज माघारीच्या दिवशी १४ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता निवडणूकीच्या रिंगणात ९ उमेदवार जरी असले परंतू खरी लढत ही भाजपा, काँग्रेस, प्रहार जशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात हाणार असून चौरंगी लढत राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूकीसाठी हे उमेदवार रिंगणा :
रावेर विधानसभा निवडणूकीत शेवटच्या दिवशी चौदा उमेदवारांनी माघार घेतली असुन ९ उमेदवार रिंगणात आहे. यात अमोल हरीभाऊ जावळे (भाजपा), धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस), नारायण हिरामण अडकमोल (बसपा), अनील छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ति पार्टी), आरिफ खालिक शेख ( ऑल इंडिया मजलिस पार्टी), खल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) मुस्ताक कमाल मुल्ला (आजाद समाज पार्टी), शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी), दारा मोहंमद जफर मोहंमद (अपक्ष) असे ९ उमेदवार रिंगणात आहे.
यांनी घेतली माघार :
शेवटच्या दिवशी माघार घेणाऱ्यांमध्ये सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.