जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर झालेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री उशीरा दुचाकीधारकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तरानीसेन राजेंद्र बारीक (वय-३०) रा. आयोध्यानगर हे त्यांची कार (ओडी ०२ बीसी ०८८७) ने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगासह अजिंठा चौफुलीकडून कालिंका मंदिराकडे जात असताना त्यांच्या मागे असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीटी 2342) दुचाकीधारकांने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवत असल्यामुळे झालेल्या अपघातात तराने तरानीसेन राजेंद्र बारीक यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलगा आणि दुचाकीवरील मुलगी व स्वत: दुचाकीधारक (पुर्ण नाव गाव माहित नाही) हे जखमी झाले. या अपघातात कारसह दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री उशीरा कारचालक तरानीसेन बारीक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.