नंदुरबार प्रतिनिधी । नर्मदा नदीतून प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून पाच जण ठार झाले असून ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंटजवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. या बोटीमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवाशी होते. यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित प्रवाशांना वाचविण्यात आलेले आहे. तथापि, यांच्यातील ३६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही प्रवासी बेपत्ता झाले असून यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.