धक्कादायक : अल्पवयीन मुलीला दारू पाजून पाच जणांचा सामुहिक बलात्कार

10 01 2013 rape10 3134261 835x547 m

 

पंढरपूर (वृत्तसंस्था) अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.

 

अल्पवयीन पीडित तरुणी ही आरोपींपैकी एकाची मैत्रीण होती. आरोपीने या मुलीला भेटण्यासाठी एका अनोळखी ठिकाणी बोलावले. तिथे त्याचे चौघे मित्र आधीच हजर होते. या पाच जणांनी तिला दारू पाजली आणि सामुहिक बलात्कार केला. यातील एकाने या सर्व घटनेचे चित्रण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच गैरफायदा घेऊन या नराधमांनी तिला ब्लॅकमेल करून अनेकदा बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, तिच्याकडे पैशांचीही सतत मागणी केली. हा सर्व प्रकार असह्य झाल्यानंतर पिडीत मुलीने आईला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Protected Content