मुंबई (वृत्तसंस्था) आज दिल्लीत भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यानंतर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु या यादीत भाजपा पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कापणार असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा राज्यातील 48 पैकी 25 जागा लढवणार आहे. सध्या भाजपाचे राज्यात 22 खासदार आहेत. यापैकी 5 खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. पाच वर्षांमधील कामगिरी, जनसंपर्क यांच्या आधारे भाजपा नेतृत्त्वाकडून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला असलायचे कळते. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल. यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला जाणार आहे.