जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मु.जे. महाविद्यालयात काल झालेल्या आसोदा येथील मुकेश सपकाळे या तरुणाच्या खूनप्रकरणी काल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कालच पोलिसांनी या खूनप्रकरणात इच्छाराम वाघोदे याला पारोळा बस स्थानकातून ताब्यात घेतले होते. त्याला आज रामानंद नगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती ए.एस. शेख यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.