शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक सुरु

72056991

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या समितीची पहिली बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम ठरविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सत्तेतील सहभाग यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक वांद्र्याच्या एमईटीमध्ये सुरु झाली असून या बैठकीला शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

Protected Content