यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली जवळच्या मनुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे हॉटेल मालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याने यात तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चिंचोली गावाजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर मनुदेवी फाट्याच्या जवळच हॉटेल रायबा आहे. मध्यंतरी बंद असलेली ही हॉटेल अलीकडेच पुन्हा सुरू झालेली आहे. दरम्यान, हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर यांच्यावर हल्ला करण्यात आला असून यात त्ो गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकलवरून दोन तरूण हॉटेलमध्ये आले असता त्यांनी बीयर मागिली. मात्र बाविस्कर यांनी बार बंद झाल्याचे सांगून बीयर देण्यास नकार दिल्यामुळे त्या तरूणाने गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात जखमी प्रमोद श्रीराम बाविस्कर यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. या गोळीबारामुळे परिसह हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.



