Home राष्ट्रीय पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार; तीन गावकऱ्यांचा मृत्यू

पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार; तीन गावकऱ्यांचा मृत्यू


ceasefire

जम्मू-काश्मिर (वृत्तसंस्था) पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

 

 

जम्मू-काश्मीरमधील मेंढर, उरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहे. त्यात रूबाना कौसर, मुलगा फजान आणि नऊ महिन्याची मुलगी शबनम हिचा मृत्यू झाला आहे. तर नवरा मोहम्मह यूसिन जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले. त्यांच्याकडून ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने हल्ला केला जात आहे. पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. यापूर्वी मानकोट जिल्ह्यातही पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आल्याने नसीम अख्तर नावाची महिला जखमी झाली होती. सलोत्री आणि मानकोट व्यतिरिक्त पुंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी आणि बालकोट भागात गोळीबार झाला. सातत्याने आठव्या दिवशी सुद्धा पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound