शिकागो वृत्तसंस्था । अमेरिकेतील शिकागोच्या दक्षिणेकडील भागातील साऊथ मेच्या ब्लॉक 5700च्या राहत्या घरावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत 13 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या असून चार जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेची माहिती टॉम अहॉर्न यांनी ट्विट वरुन दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिकागो येथेही साऊथ मेच्या ब्लॉक 5700च्या राहत्या घरावर रविवारी 12:35 वाजेच्या दरम्यान हा गोळीबार झाला. ज्या घरावर गोळीबार करण्यात आला त्या घरात पार्टी सुरु असल्याचा अंदाज शिकागो पोलिसांनी वर्तवला आहे. जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही. यात 13 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या असून जखमी जणांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शिकागो पोलिसांनी दिली आहे. ही घटना स्थागिक शिकागो पोलिसांच्या वेळेनूसार आज सकाळी 6 वाजता घडली.