विमानाला लॅंडिंग करतांना आग ; ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

D51Nh0SU0AAyteh

 

मॉस्को (वृत्तसंस्था) मॉस्कोमधील शीरीमीमेटयेवो या विमानतळावर एका प्रवासी विमानाला इमर्जन्सी लॅंडिंग करताना लागलेल्या आगीत ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय.

 

 

मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. मात्र, त्याचवेळी विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उड्डाण केलेले विमाना तात्काळ माघारी बोलविण्यात आले. विमानाचे लॅंडिंग करतांना विमानाला मागिल बाजूस आग लागली. आग नेमकी कशामुळे ही लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विमान अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेही एक समिती तपास करणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांनी सांगितले की, खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी. दरम्यान, अपघातग्रस्त विमान हे एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे होते.

Add Comment

Protected Content